Friday 4 July 2014

माझी रित !

भावानो व बहिणीनो
"जी गोष्ट माझ्याबाबतीत होऊ नये असे वाटते ती मी इतरांच्या बाबतीत करणार नाही "
मी १९७७ सालापासून     बालपणाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीच लपवल नाही . मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रमाणे नेहमीच ब्राम्हण्याचा कडाडून विरोध करत आलोय .समतायुक्त ,एकरस, एकजीव,एकवर्ण असा हिंदू समाज निर्माण  व्हावा यासाठी महाराष्ट्रभर मागील २०  वर्षापासून विविध उपक्रमामध्ये  भाग घेउन प्रयत्न करतो आहे. त्यासाठी राज्यभर  सतत भेटी ,प्रबोधन , प्रवास सुरु आसतो  सध्या माझ्याकड़े "सामाजिक समरसता मंच " या संघ परिवारातील संघटनेच प. महाराष्ट्र  "प्रांत कार्यवाह "अशी जबाबदारी आहे
      जात ही  आपल वास्तव बनलीय,   सोयरीक ही जगभर नेहमीच बरोबरीच्या लोकात होत आसते.त्यामुळे जीवनप्रवाहात जे मागे राहिले त्याना आरक्षणासारख्या अनेक  विशेष प्रयत्नाने सर्वाबरोबर आणावे लागेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे .तेव्हाच आर्थिक, सामाजिक राजकीय ,सांस्कृतिक स्तरावरील बरोबरीच्या लोकात सोयरीक होउन जातीअंताची चळवळ यशस्वी होइल
           " जी गोष्ट माझ्याबाबतीत होऊ नये असे वाटते ती मी इतरांच्या बाबतीत करणार नाही "
हे माझ साधसुध जीवन जगण्याच तत्वज्ञान आज अखेर राहील .हे वाक्य आजही मी दीपस्तंभासारख र्हुदयी कोरून ठेवलय. मला जर कोणी शिवी देऊ नये असे वाटत असेल तर मी कुणालाही शिवि देता कामा नये .मला कोणी ही फसवू नये असे वाटते ना ? मग मी ही कुणाला फसवता कामा नये .आपल्या  आई बहिणी वा पत्नीशी कोणीही वाईट वा चुकीच वागू नये  असे आपणा सर्वाना वाटते मग आपणह़ी कोणाच्या आई बहिणी वा पत्नीशी वाईट वा चुकीच वागता कामा नये .
  किती साध सोप जीवन जगण्याच हे तत्वज्ञान आहे पहा बर !
     जरा विचार करा.असे आपण सारे जण जगलो वागलो  तर या जगात भांडण तंटा होण्याच कारणच संपुन जाईल असे मला वाटत .
आपणास काय वाटते ?
विजय ग. गावडे ,सांगली

धनगर सारा ऐक !

पाल महासभा ही उत्तरेतील धनगर समाजाची 1922 सालापासून कार्य करणारी संघटना आहे .पाल महासभेच्या बडोदा गुजराथ येथील आधिवेशनास  सर्वासोबत  विशेष आमंत्रित म्हणून मला उपस्थित रहाता आल. आपला धनगर  पशुपालक  समाज वेगवेगळी प्रादेशिक नावाऐवजी    धनगर हे  ऐकच  नाव सर्व उत्तर भारतात  आता   वापरु   लागला आहे. यातूनच पुढे सर्व देशभरातील धनगर समाजात  मानसिक एकरूपता व्हावी या  उद्देशान भारतीय धनगर परिषदेच काम उभ राहील .

       कुरंबा, ,कुरमा ,कुरमन्स ,कुरबर,गडरिया ,भारवाड,मालधारी, रायका ,देवासी ,गाडरी ,बकरवाल गड्डी पाल ,बघेल अशा ऐक ना अनेक प्रादेशिक  नावान संपूर्ण देशभर धनगर बांधव ओळखला जातो . धनगर हां बहुभाषिक समाज आहे.  पाण्याला  जसे इंग्रजीत वाँटर ,कानडीत नीर तर संस्कृतमध्ये जल म्हटलेमुळे पाण्याचे मुळगुणधर्म बदलत नाहित तसेच प्रत्येक भाषा वा प्रदेशामुळे धनगर समाजास वेगवेगळी नाव पडली आसली तरी पशुपालक धनगर बांधव देशभर हाडीमासी ऐकच आहे .
           पण तो मनाने अद्याप ऐक नाही .हि मानसिक एकता नसलेमुळे common line of thinking नाही मग त्यातून येणारी  common line of action कसी निर्माण होणार ? हा  खरा प्रश्न आहे याला उत्तर म्हणून प्रबोधन व समन्वय यासाठी  यातूनच भारतीय धनगर परिषद काम करू लागली .
जंगल व   रानोमाळातील पशुचराईमुळे  भटकंती यामुळे हाडामासानी ऐक असुनही ऐकमेकाचा  परिचय नाही .त्यामुळे  संघटन नाही . खरे तर संघटना हाच कलीयुगातील देव आहे .जे जे समाज संघटित तेच सजग व जागृत आसलेमुळे आपले स्वत:चे हितरक्षण करु शकले .मात्र असंघटित  धनगर समाजाचे सतत सजग व जागृती नसलेमुळे अहितच आजअखेर होत आले आहे .आदिवासी हाक्क असुनही आमलबजावणी न होण हा हि तोच प्रकार आहे .
          मी सांगली जिल्ह्यात राहतो शेजारी कर्नाटकच्या विजापुर ,बेळगाव जिल्ह्यात हजारो वर्षापासून तेथील कुरबर नावानी ओळखल्या जाणारया धनगर समाजासोबत विवाहसंबंधामुळे हाडीमासी आमच एकत्व आहे .या कर्नाटक राज्यातील धनगर समाजाचे याच पध्दतीने शेजारच्या आंध्र ,केरळ, तमिळनाडूतील कुरबा, कुरमन्स, कुरंबा नावाने ओळखल्या   जाणारया धनगरासी असेच एकत्व आहे .जसे की  "अ "हा  "ब" चा नातेवाईक आहे व "ब" हा "क " चाही नातेवाईक आहे म्हणजेच "अ " देखिल "क " चा नातेवाईक होतोच हे एकीच सूत्र आता आपण समजुन घेऊ या .त्यातूनच समर्थशाली संघटन उभ राहील.
     दक्षिण भारताप्रमाणे   उत्तर भारताशी  असेच स्नेहबांध आहेत  धूळे नंदुरबारचे धनगर गुजराथच्या भारवाड तर नागपुर चंद्रपुरचे धनगर बांधव मध्यप्रदेश व छत्तिसगढ़मधील पाल ,बघेल नावाने ओळखल्या जानारया धनगर समाजासोबत  जोडले गेले आहेत .गुजराथी धनगर राजस्थानशी हाडीमासी जूडले आहेत. हे प्रत्यक्ष सिध्द होतय
न मागता देखिल ५% आरक्षण ज्या मुस्लिम समाजाला मिळाल त्या मुस्लिम समाजा पेक्षा पशुपालक धनगर समाजाची लोकसंख्या देशात मोठी आहे .ते धनगर पशुपालन व्यवसायातील रानोमाळ च्या भटकंतीमुळे एकत्र कधी आलेच नाहित जंगल कायदे ,गायरान ,कुरणावरील वाढती कारखानदारीमुळे पशुपालन आड़चणीत आलय.तरी संघटन नाही .  या जंगल रानोमाळावरील  भटक्या  धनगर समाजाच संघटन     हे बेडकाच वजन करण्या ऐवढ आवघड  वाटतय पण आपल्या सर्वांच्या सहकार्यान मोबाईल ,फेसबुक ,वाट्सअपचे काळात हे नक्की होइल  कारण या मोकळया पारदर्शक काळात सत्य हाच परमेश्वर मानणारा धनगर समाज पुन्हा प्रामणिक शाशनकर्ती जमात होईल .रामायणकाळापासून या भूमित सत्यच जिंकत आलय .आता
गरज आहे सर्वांचे सहकार्याची 
मगच हाडीमासी  म्हणजेच    तनानी एक असणारा  समाज  मनानी व सामाजिक विकसासाठी धनाने देखिल पुढे एकत्र येईल. सर्वात महत्वाच म्हणजे संघटित शक्तिला शत्रु नसतो  त्यामुळे चंद्रगुप्त ,विजयनगरचे हाक्कराय बुक्कराय, वा होळकरशाही प्रमाणे "देश प्रथम " या न्यायाने वागणारा हा धनगर समाज देशाच्या  मुख्य प्रवाहात येईल सतवचनी हा समाज देशाला पुन्हा वैभवाकड़े घेउन जाणेत आपला मोठा वाटा उचलेल यात शंका नाही

   विजय ग.गावडे ,महासचिव
     भारतीय धनगर परिषद  
               सांगली
             7588167034

Thursday 3 July 2014

ठोकशाही ते लोकशाही


मी मतदान केले आपणही आवश्य करालच  !
  आपण सर्वानी लोकशाही मार्गानी देशात मोठ सत्तंतर घडवल तेही कोणत्याही हिंसाचाराशिवाय
      आपल्या  लोकशाहीच महत्व ईराक मधील यादवीमुळे सर्वांच्याच ध्यानात आल असेल .भारतामध्ये जशी विविधता आहे तसीच काहीशी
विविधता ईराकमध्ये आहे . शिया ,सुन्नी त्यातील अफगाणीस्थान प्रमाणे असणार्या अनेक  रानटी टोळया यांच्यातील सत्तेसाठी सुरु असलेला क्रूर  रक्तरंजित  संघर्ष त्यामुळे तेथील  संपलेल कायद्याच राज्य यातून आपण काही बोध घेणार का ?
  ज्या गटाने जादा मुडदे पाडले ते सत्ताधीश ही विचारसरणी आज २१ व्या शतकात सोमालिया ,इथोपिया ,पेलीस्टईन ,इराक इराण, अफगाणीस्थान ,पाकिस्थान येथे दुर्दैवाने सरसकट सुरु आहे .हे त्या जनतेच दुर्दैव  दुसर काय !
केवळ दर पाच वर्षानी आपल्या बोटामध्ये भारतीय घटनेने आलेल्या शक्तीमुळे असे अनेक सत्तेतील बदल आपण लीलया एकही रक्ताचा थेंब न सांड़ता घडवले आहेत .मतदानाच्या सार्वजनिक सुट्टीला पिकनिक साजरी करणारे यातून  काही बोध घेतील का ? 
      दुर्दैवाने हे सारे श्रीमंत वा उच्च मध्यमवर्गीयच असतात .नियम कायदे मोडून मी कस मिळवल कायदे हे मोड़ण्यासाठीच असतात .अशी मुजोर वर्चस्ववादी मानसिकता असणारे हे देखिल कायद्याच राज्य संपल की काय होत ते रोज दूरदर्शनवर वरील अराजक दृश्यातुन  पहात असतील  कायदे मोडले की काय होत याचा त्यानीही यातून बोध  घ्यावा .
"बंधुभाव हाच खरा धर्म " हे सांगणार आपली  संत मंडळी हजारो वर्षे "तु तसाच मी " ,जळी, स्थळी,काष्टी,पाषाणी  परमेश्वर भरून राहिला आहे हे सांगत आली . आपले माजी राष्ट्रपती ऐ.पी.जे.अब्दुलकलाम म्हणतात" जेव्हा या निर्जीव वास्तु मधील आणु रेणू तील केंद्रकाभोवती इलेक्ट्रन प्रोटॉन जेव्हा गतीने  फिरत आसतात हे मी पहातो तेव्हा या सर्व निर्जीव वाटणारया सृष्टित भगवान शंकरांचे तांडव नृत्य सुरु आहे असे मला वाटते ."
   बंधुनो !
       चराचर सृष्टित परमेश्वर भरून राहिलाय हा विचार संतानी हजारो वर्षे सांगितला तोच आधुनिक विज्ञान महर्षी असणारे थोर शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यानी सिध्द केला . ही भारताची अध्यात्मिक ताकद आहे .अनेक जण पुरोगामी पणाचा टेंबा मिरवत हा अध्यात्मिक वारसा तोड़ण्याच पाप करत आहेत .हे संत परंपरेच  चिलखत हजारो वर्षे मोगली सत्तेत वा इंग्रजी राजवटीत ईराक पेक्षा मोठी  विविधता असुनही भारताचा बचाव करते आहे . शक, हुन,यवन इंग्रज असे किती  आले अन  किती गेले आनेक संकटे झेलूनही  भारत पुन्हा पुन्हा  उभा राहतो आहे  तो  "तु तसाच मी "या बंधुभाव जागृत करणार्या संत विचारामुळेच
  डॉक्टर आंबेडकरानी देखिल स्वतंत्र व समतेच्या रक्षणासाठी याच बंधुतेची खरी आवश्यकता आहे असे म्हटलय.
आपले कायद्याचे राज्य व लोकशाही  टिकवणेसाठी संत विचाराचा जागर करणारी पंढरीची वारी,त्यातील वारकरी त्यांच्या   दिंडया यातच आपली खरी शक्ती दडली आहे .याची टिंगल टवाळी करणारयाना विचाराचा लढ़ा विचारानी लढ़ुन  आता खरच आवरायला हवे . बंधुतेच ,मानवतेच दुसर नाव बंधुभाव .
"बंधुभाव हाच खरा धर्म"
          विजय ग .गावडे सांगली
           ०७५८८१६७०३४

पण काही तरी चुकतय !

गरीब मराठा समाज आरक्षण मिळालेच पाहिजे >>>>>पण काही तरी चुकतय
--------------------------
ग्रामपंचायत ते  मुख्यमंत्रीपदापर्यंत  सत्तास्थाने आज ज्याला  मराठा समजले जाते त्या घटकाकडेच आसताना मराठा समाजाचा ते विकास करू शकले नाहित मग अन्य समाजाचा  विकास झाला असे कसे म्हणावे  ?
   कुणबी दाखले काढून  "माझे ते माझे आणी तुझे ते पण माझेच" या न्यायाने अगोदरच OBC चे राजकीय आरक्षण यानी  मिळवले आसताना आणखी स्पेशल रिझर्व्हेषन प्रत्यक्षात मराठा म्हणून गोळा केलेला  32 नव्हे तर 22 ते 25 %  हा समाज आसताना 16 % रिझर्व्हशन सत्तेच्या जोरावर भारतीय घटना धाब्यावर बसवून दिले जात आहे . हा तथाकथित पाटिल देशमुख आसनारा मराठा समाज झोपडपट्टीत कुठे दिसतो का ? चावडीवर  सामाजिक न्याय देण्याची ज्यांची जबाबदारी होती त्यानीच आम्हाला सामाजिक न्याय मिळाला नाही म्हणने  हे कोणत्या न्यायाला धरून आहे .रिझर्व्हशन हे गरीबी घालवणेसाठी नसून अस्पृश्य समजल्या गेलेल्या दलित समाजास SC व जंगलात माळरानात उपेक्षित वंचित जीन जगणारया धनगर आदिवासी जमातींना ST तर बारा बलुतेदार व काही आलुतेदाराना OBC च्या सवलती भारतीय घटनेने दिल्या आहेत या OBC रिझर्वशन मध्ये कुणबी दाखले काढून यानी पुर्वीच हे आरक्षण आपली सत्ता व संख्येच्या जीवावर वर्चस्ववादी सरंजामशाही पध्दतीने मिळवले आहे.
       जुन्या OBC, SC,ST मधील हुशार मूल Open मधील ज्या 50 %जागेवर निवडली जात तो open platform आता 50% वरून आता 29% वर आलय फ़क्त उर्वरित open वर्गाचेच  नव्हे   तर  SC, ST, OBC च  अप्रत्यक्ष  नुकसानच झालय. हे कधी कळणार ?
          चावडीवर बसून बोक्यांच्या भांडणात लोण्याचा आख्खा गोळाच पळवणेच हे या सरंजामदारांचे षडयंत्र गरीब कुणबीसदृश मराठा बांधवाना कधी कळणार ?
        22-25 % मराठा वर्गास 16 %रिझर्वशन मग 14-15 %असणारे असंघटित  धनगर स्माजास 3.5 %रिझर्व्हशन का ? त्याच प्रमाणात 10 % का नाही याच सरकार उत्तर देइल का ?
           आजची मराठा जात राजकारणात लोकशाहीत सहज निवडून यावे म्हणून कृत्रिमरित्या बनवली आहे . वतनदारीसाठी  शिवरायाना यातील मोठ्या वर्गाने विरोध केला ते शिवराय कुळवाडी भूषण होते    मुळात मराठा ही जात प्राचीन परंपरेत कुठेच दिसत नाही ही प्रादेशिकच आहे. .जसा मारवाड़ भागातील मारवाड़ी ,कर्णाटकचा कानडी, गुजराथचा गुजराथी तसेच महाराष्ट्रातील मराठा  होय पूर्वी मुम्बई इलाखा वा प्रांत होता तेव्हा सर्व बलुतेदार समाज मराठा सुतार मराठा लोहार मराठा कुंभार इतकाच काय धनगर ही मराठा समाजातील उपजाती आहे असे सांगुनच आदिवासी अरक्षण याच वतनदारानी रोखले कारण तेच सत्तेत आहेत .त्यानीच गरीब कुणबी सदृश मराठा बांधवा चा ही विकास केला नाही .
          म्हनुनच रामदास स्वाम़ीनी ब्राम्हण असुनही "मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा "म्हटल .ब्राम्हण असुनही  बाजीराव पेशवे मराठ्यांचे सेनापती इतिहासात नोंदले गेले ,होळकर फौजा धनगर फौजा  म्हणून नव्हे तर मराठा सुभेदाराची फ़ौज म्हणून इतिहासात ओळखल्या गेल्या.आज काही मोजक्या वर्गाला  मराठा  जात म्हणून ओळखल जात हे षडयंत्र यशवंतराव चव्हाण यानी केल. ही     मंडळी कुठून यात आली   जनगन मन मध्ये देखिल मराठा शब्द प्रदेशवाचकच आला आहे
सरकारने प्रथम मराठा कोण हे ठरवावे मग त्यातील आन्नदाता गरीब अल्पभुधारक वर्गाला विकासा ची संधी नक्की द्यावी घाई करून सगळेच मुसळ केरात टाकू नये अन्यथा ग्रामीण भागातील सर्व शेत जमीनीचे फेर वाटप करून आत्ता जसे आरक्षण दिले आहे ते खुशाल द्यावे मग कदाचित याला कोर्टात कोणी आव्हान देणार नाही .
धनगर समाजाला हक्काच आरक्षण नाकारणारया व गरीब कुणबी सदृश  मराठा समाजाचा  विकासाचा मार्ग आडवंणारे या सरकार कडून या स्वार्थी निर्णयापेक्षा वेगळी आपेक्षा होती पण व्यर्थ याना जनता नक्की धडा शिकवेल
    विजय ग गावडे .

विठुमाउली आता साउली सर्वांची

संत नामदेव विठू माउली किती साधी भोळी सर्वाप्रती आत्मभाव असणारी आहे या विषयी म्हणतात "भाजी भाकरीचा हां देव काळी लंगोटी हाती काठी बोले महारची थेट मराठी " सर्व सामान्य   बंधुंची भाषा तो बोलतो त्याला काहीच अनाकलनीय वा सोवळ ओवळ असूच शकत नाही 

             हिंदू धर्मात पूजा आर्चना ,धार्मिक विधि यांचे आधिकार ब्राम्हण ,गुरव जाती समुहाना हजारो वर्षापासून वंशपरंपरागत पध्दतीने दिले गेले आहेत . हे ऐका आर्थान महर्षी मनुंने याना रिझर्वेशनच दिल आहे.यातूनच श्रेष्ट कनिष्ट आशा जातिभेदानी आख्खा सनातन धर्म पोखरला गेला. यातून आलेल्या उच्चनिचतेमुळे आपल्यासारखाच जिताजागता माणूस गावकुसाबाहेर ठेवला .आपल्या घरात कुत्री मांजर खुशाल स्वयंपाक घरापर्यंत जात पण या समाजातील स्वच्छतेच काम करनारया या भावंडाना "अस्पृश्य ठरवून उंबरयाच्या बाहेरच  हजारो वर्ष उभ केल गेल . ज्ञानेश्वरानी हिंदू धर्माच्या तत्वज्ञानातुन लिहिलेल "पसायदान " हे विश्वाची उद्गघोषणा व्हावी अस आहे "वसुधैव कुटुंबकम " हे विश्वच ऐक कुटुंबाप्रमाणे वागावे हा विचार  येथील विविध जातीपातीतुन आलेल्या ऋशी मुनि  साधु संतानी या देशाला दिला .आकाशातील पक्षी ,मुके पशु व इतकच काय पाण्यातील माशाची काळजी घेणारे विचार सांगितले गेले .पण ज्यानी धर्माचा आर्थ समजाऊन सांगावा त्यानीच स्वार्थी उच्चनीच असा बुरसटलेला प्रतिगामी विचार मांडला तेव्हा कर्णाला देखिल म्हणाव लागल "दैवायत्तं कुले जन्म: मदायत्तं तु पौरष:" भगवान श्रीकृष्णानी गुण व कर्मावरूनच माणसाच लहान मोठपण ठरत हे गीतेत सांगीतल .परोपकाराची काम करणे म्हणजे पूण्य तर परपीडा देण हे खर पाप हे सांगुन देखिल  खोटया पापपुण्यात समाज गुरफटवला गेला त्यामुळे आज मोठया दुःखान म्हणावस वाटतय "हिंदू धर्माचे विचार उच्च असले तरी आचार नीचच राहिला "

     आज राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आशा अनेक संघटनामार्फ़त हिंदू धर्म म्हणजेच मानवता धर्म हां मुळ साधु संतानी दिलेला  आर्थ प्रत्यक्ष सकारणेसाठी अनेक प्रयत्न करत आसतो पण झारीतिल शुक्राचार्यामुळे संघाच खर चित्र आजअखेर समाजासमोर आलच नाही हे दुर्दैव .साखर गोड आहे हे जस प्रत्यक्ष खाल्याशिवाय समजत नाही तसच संघ विचाराच आहे तो प्रत्यक्ष आनुभवावा लागेल .
    नाशिकच "श्री शंकराचार्य न्यास व रा.स्व. संघ धर्म जागरण यांच्या आशाप्रकारच्या  एकजात, एकवर्ण  हिंदू समाज निर्मितीच्या प्रयत्न करनारे  कार्यास भारतीय धनगर परिषदेच्यावतीने  हार्दिक शुभेच्छा !
    या निमित्ताने मा आन्नासाहेब डांगे
अध्यक्ष देवस्थान समिति व मंदिर समिति   यांच्या असा निर्णय राबवणेच्या कठोर निर्धाराला लाख लाख सलाम !

Wednesday 12 February 2014

धनगर एक शासनंकर्ती जमात > दशा व दिशा

जेव्हा - जेव्हा या देशात धनगरांचे राज्य राहिले तेव्हा - तेव्हा हा भारत देश सोन्यासारखा चकाकलेला आहे . जगात वैभवाच्या शिखरावर विराजमान झालेला आहे . ज्या - ज्या प्रांतात वा भागात धनगरांचे साम्राज्य राहिले त्या - त्या ठिकाणी त्या संबंधित राज्यकर्त्यांनीनेहमीच प्रजेच्या उन्नतीचाच विचार केला . याला इतिहास साक्षी आहे .धनगर समाज हा मुक्या जनावरांची मनं ,दुःख व वेदना जाणनारा समाज आहे . त्यामूळे आज धनगरांच्या हातात सत्ता आल्यास तो तळागळातील शोषित ,पिडीत ,दीन ,दुःखी लोकांचे मन निश्चितच जाणून घेऊन त्यांचा प्रामाणिक पणे विकास करेलच याबद्दल किंचितही शंका नाही .कर्नाटक राज्यात काँग्रेसची जरी सत्ता असली तरी तेथील धनगर समाजाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अल्पावधित सुशासनाची प्रचीती दिलेली आहेच.यासाठीच धनगरांच्या हातात राजसत्ता हवी .

Monday 14 January 2013

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


 नमस्कार  मित्रांनो , 
              आज  आपणा  सर्वांच्या  भेटीसाठी  ब्लॉगस्पॉटवर  मकरसंक्रांतीच्या  मुहूर्तावर  मी आलो  आहे .
आपणा सर्वांना   मकरसंक्रांतीच्या  हार्दिक शुभेच्छा .
  
आपला  मित्र 
 विजय  ग .गावडे       
  ४५७ रविवार पेठ माधवनगर    
  ७५८८१६७०३४ कृषी