मी मतदान केले आपणही आवश्य करालच !
आपण सर्वानी लोकशाही मार्गानी देशात मोठ सत्तंतर घडवल तेही कोणत्याही हिंसाचाराशिवाय
आपल्या लोकशाहीच महत्व ईराक मधील यादवीमुळे सर्वांच्याच ध्यानात आल असेल .भारतामध्ये जशी विविधता आहे तसीच काहीशी
विविधता ईराकमध्ये आहे . शिया ,सुन्नी त्यातील अफगाणीस्थान प्रमाणे असणार्या अनेक रानटी टोळया यांच्यातील सत्तेसाठी सुरु असलेला क्रूर रक्तरंजित संघर्ष त्यामुळे तेथील संपलेल कायद्याच राज्य यातून आपण काही बोध घेणार का ?
ज्या गटाने जादा मुडदे पाडले ते सत्ताधीश ही विचारसरणी आज २१ व्या शतकात सोमालिया ,इथोपिया ,पेलीस्टईन ,इराक इराण, अफगाणीस्थान ,पाकिस्थान येथे दुर्दैवाने सरसकट सुरु आहे .हे त्या जनतेच दुर्दैव दुसर काय !
केवळ दर पाच वर्षानी आपल्या बोटामध्ये भारतीय घटनेने आलेल्या शक्तीमुळे असे अनेक सत्तेतील बदल आपण लीलया एकही रक्ताचा थेंब न सांड़ता घडवले आहेत .मतदानाच्या सार्वजनिक सुट्टीला पिकनिक साजरी करणारे यातून काही बोध घेतील का ?
दुर्दैवाने हे सारे श्रीमंत वा उच्च मध्यमवर्गीयच असतात .नियम कायदे मोडून मी कस मिळवल कायदे हे मोड़ण्यासाठीच असतात .अशी मुजोर वर्चस्ववादी मानसिकता असणारे हे देखिल कायद्याच राज्य संपल की काय होत ते रोज दूरदर्शनवर वरील अराजक दृश्यातुन पहात असतील कायदे मोडले की काय होत याचा त्यानीही यातून बोध घ्यावा .
"बंधुभाव हाच खरा धर्म " हे सांगणार आपली संत मंडळी हजारो वर्षे "तु तसाच मी " ,जळी, स्थळी,काष्टी,पाषाणी परमेश्वर भरून राहिला आहे हे सांगत आली . आपले माजी राष्ट्रपती ऐ.पी.जे.अब्दुलकलाम म्हणतात" जेव्हा या निर्जीव वास्तु मधील आणु रेणू तील केंद्रकाभोवती इलेक्ट्रन प्रोटॉन जेव्हा गतीने फिरत आसतात हे मी पहातो तेव्हा या सर्व निर्जीव वाटणारया सृष्टित भगवान शंकरांचे तांडव नृत्य सुरु आहे असे मला वाटते ."
बंधुनो !
चराचर सृष्टित परमेश्वर भरून राहिलाय हा विचार संतानी हजारो वर्षे सांगितला तोच आधुनिक विज्ञान महर्षी असणारे थोर शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यानी सिध्द केला . ही भारताची अध्यात्मिक ताकद आहे .अनेक जण पुरोगामी पणाचा टेंबा मिरवत हा अध्यात्मिक वारसा तोड़ण्याच पाप करत आहेत .हे संत परंपरेच चिलखत हजारो वर्षे मोगली सत्तेत वा इंग्रजी राजवटीत ईराक पेक्षा मोठी विविधता असुनही भारताचा बचाव करते आहे . शक, हुन,यवन इंग्रज असे किती आले अन किती गेले आनेक संकटे झेलूनही भारत पुन्हा पुन्हा उभा राहतो आहे तो "तु तसाच मी "या बंधुभाव जागृत करणार्या संत विचारामुळेच
डॉक्टर आंबेडकरानी देखिल स्वतंत्र व समतेच्या रक्षणासाठी याच बंधुतेची खरी आवश्यकता आहे असे म्हटलय.
आपले कायद्याचे राज्य व लोकशाही टिकवणेसाठी संत विचाराचा जागर करणारी पंढरीची वारी,त्यातील वारकरी त्यांच्या दिंडया यातच आपली खरी शक्ती दडली आहे .याची टिंगल टवाळी करणारयाना विचाराचा लढ़ा विचारानी लढ़ुन आता खरच आवरायला हवे . बंधुतेच ,मानवतेच दुसर नाव बंधुभाव .
"बंधुभाव हाच खरा धर्म"
विजय ग .गावडे सांगली
०७५८८१६७०३४
Thursday, 3 July 2014
ठोकशाही ते लोकशाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment