भावानो व बहिणीनो
"जी गोष्ट माझ्याबाबतीत होऊ नये असे वाटते ती मी इतरांच्या बाबतीत करणार नाही "
मी १९७७ सालापासून बालपणाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीच लपवल नाही . मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रमाणे नेहमीच ब्राम्हण्याचा कडाडून विरोध करत आलोय .समतायुक्त ,एकरस, एकजीव,एकवर्ण असा हिंदू समाज निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्रभर मागील २० वर्षापासून विविध उपक्रमामध्ये भाग घेउन प्रयत्न करतो आहे. त्यासाठी राज्यभर सतत भेटी ,प्रबोधन , प्रवास सुरु आसतो सध्या माझ्याकड़े "सामाजिक समरसता मंच " या संघ परिवारातील संघटनेच प. महाराष्ट्र "प्रांत कार्यवाह "अशी जबाबदारी आहे
जात ही आपल वास्तव बनलीय, सोयरीक ही जगभर नेहमीच बरोबरीच्या लोकात होत आसते.त्यामुळे जीवनप्रवाहात जे मागे राहिले त्याना आरक्षणासारख्या अनेक विशेष प्रयत्नाने सर्वाबरोबर आणावे लागेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे .तेव्हाच आर्थिक, सामाजिक राजकीय ,सांस्कृतिक स्तरावरील बरोबरीच्या लोकात सोयरीक होउन जातीअंताची चळवळ यशस्वी होइल
" जी गोष्ट माझ्याबाबतीत होऊ नये असे वाटते ती मी इतरांच्या बाबतीत करणार नाही "
हे माझ साधसुध जीवन जगण्याच तत्वज्ञान आज अखेर राहील .हे वाक्य आजही मी दीपस्तंभासारख र्हुदयी कोरून ठेवलय. मला जर कोणी शिवी देऊ नये असे वाटत असेल तर मी कुणालाही शिवि देता कामा नये .मला कोणी ही फसवू नये असे वाटते ना ? मग मी ही कुणाला फसवता कामा नये .आपल्या आई बहिणी वा पत्नीशी कोणीही वाईट वा चुकीच वागू नये असे आपणा सर्वाना वाटते मग आपणह़ी कोणाच्या आई बहिणी वा पत्नीशी वाईट वा चुकीच वागता कामा नये .
किती साध सोप जीवन जगण्याच हे तत्वज्ञान आहे पहा बर !
जरा विचार करा.असे आपण सारे जण जगलो वागलो तर या जगात भांडण तंटा होण्याच कारणच संपुन जाईल असे मला वाटत .
आपणास काय वाटते ?
विजय ग. गावडे ,सांगली
Friday, 4 July 2014
माझी रित !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment