गरीब मराठा समाज आरक्षण मिळालेच पाहिजे >>>>>पण काही तरी चुकतय
--------------------------
ग्रामपंचायत ते मुख्यमंत्रीपदापर्यंत सत्तास्थाने आज ज्याला मराठा समजले जाते त्या घटकाकडेच आसताना मराठा समाजाचा ते विकास करू शकले नाहित मग अन्य समाजाचा विकास झाला असे कसे म्हणावे ?
कुणबी दाखले काढून "माझे ते माझे आणी तुझे ते पण माझेच" या न्यायाने अगोदरच OBC चे राजकीय आरक्षण यानी मिळवले आसताना आणखी स्पेशल रिझर्व्हेषन प्रत्यक्षात मराठा म्हणून गोळा केलेला 32 नव्हे तर 22 ते 25 % हा समाज आसताना 16 % रिझर्व्हशन सत्तेच्या जोरावर भारतीय घटना धाब्यावर बसवून दिले जात आहे . हा तथाकथित पाटिल देशमुख आसनारा मराठा समाज झोपडपट्टीत कुठे दिसतो का ? चावडीवर सामाजिक न्याय देण्याची ज्यांची जबाबदारी होती त्यानीच आम्हाला सामाजिक न्याय मिळाला नाही म्हणने हे कोणत्या न्यायाला धरून आहे .रिझर्व्हशन हे गरीबी घालवणेसाठी नसून अस्पृश्य समजल्या गेलेल्या दलित समाजास SC व जंगलात माळरानात उपेक्षित वंचित जीन जगणारया धनगर आदिवासी जमातींना ST तर बारा बलुतेदार व काही आलुतेदाराना OBC च्या सवलती भारतीय घटनेने दिल्या आहेत या OBC रिझर्वशन मध्ये कुणबी दाखले काढून यानी पुर्वीच हे आरक्षण आपली सत्ता व संख्येच्या जीवावर वर्चस्ववादी सरंजामशाही पध्दतीने मिळवले आहे.
जुन्या OBC, SC,ST मधील हुशार मूल Open मधील ज्या 50 %जागेवर निवडली जात तो open platform आता 50% वरून आता 29% वर आलय फ़क्त उर्वरित open वर्गाचेच नव्हे तर SC, ST, OBC च अप्रत्यक्ष नुकसानच झालय. हे कधी कळणार ?
चावडीवर बसून बोक्यांच्या भांडणात लोण्याचा आख्खा गोळाच पळवणेच हे या सरंजामदारांचे षडयंत्र गरीब कुणबीसदृश मराठा बांधवाना कधी कळणार ?
22-25 % मराठा वर्गास 16 %रिझर्वशन मग 14-15 %असणारे असंघटित धनगर स्माजास 3.5 %रिझर्व्हशन का ? त्याच प्रमाणात 10 % का नाही याच सरकार उत्तर देइल का ?
आजची मराठा जात राजकारणात लोकशाहीत सहज निवडून यावे म्हणून कृत्रिमरित्या बनवली आहे . वतनदारीसाठी शिवरायाना यातील मोठ्या वर्गाने विरोध केला ते शिवराय कुळवाडी भूषण होते मुळात मराठा ही जात प्राचीन परंपरेत कुठेच दिसत नाही ही प्रादेशिकच आहे. .जसा मारवाड़ भागातील मारवाड़ी ,कर्णाटकचा कानडी, गुजराथचा गुजराथी तसेच महाराष्ट्रातील मराठा होय पूर्वी मुम्बई इलाखा वा प्रांत होता तेव्हा सर्व बलुतेदार समाज मराठा सुतार मराठा लोहार मराठा कुंभार इतकाच काय धनगर ही मराठा समाजातील उपजाती आहे असे सांगुनच आदिवासी अरक्षण याच वतनदारानी रोखले कारण तेच सत्तेत आहेत .त्यानीच गरीब कुणबी सदृश मराठा बांधवा चा ही विकास केला नाही .
म्हनुनच रामदास स्वाम़ीनी ब्राम्हण असुनही "मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा "म्हटल .ब्राम्हण असुनही बाजीराव पेशवे मराठ्यांचे सेनापती इतिहासात नोंदले गेले ,होळकर फौजा धनगर फौजा म्हणून नव्हे तर मराठा सुभेदाराची फ़ौज म्हणून इतिहासात ओळखल्या गेल्या.आज काही मोजक्या वर्गाला मराठा जात म्हणून ओळखल जात हे षडयंत्र यशवंतराव चव्हाण यानी केल. ही मंडळी कुठून यात आली जनगन मन मध्ये देखिल मराठा शब्द प्रदेशवाचकच आला आहे
सरकारने प्रथम मराठा कोण हे ठरवावे मग त्यातील आन्नदाता गरीब अल्पभुधारक वर्गाला विकासा ची संधी नक्की द्यावी घाई करून सगळेच मुसळ केरात टाकू नये अन्यथा ग्रामीण भागातील सर्व शेत जमीनीचे फेर वाटप करून आत्ता जसे आरक्षण दिले आहे ते खुशाल द्यावे मग कदाचित याला कोर्टात कोणी आव्हान देणार नाही .
धनगर समाजाला हक्काच आरक्षण नाकारणारया व गरीब कुणबी सदृश मराठा समाजाचा विकासाचा मार्ग आडवंणारे या सरकार कडून या स्वार्थी निर्णयापेक्षा वेगळी आपेक्षा होती पण व्यर्थ याना जनता नक्की धडा शिकवेल
विजय ग गावडे .
Thursday, 3 July 2014
पण काही तरी चुकतय !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment